Rashtriya Krida Din
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त शेठ चंदनमल मुथा आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयामध्ये कार्यशाळा संपन्न
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आर्यांग्ल महाविद्यालयामध्ये क्रीडा विभागाच्या वतीने एक क्रीडा कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खेळाच्या महत्वाविषयी माहिती सांगण्यात आली तसेच योगा, सूक्ष्म व्यायाम आणि कवायतीचेही प्रात्यक्षिक करून घेण्यात आले व बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यशाळेची सुरुवात आयुर्वेदाचे आराध्य दैवत धन्वंतरी पूजनाने व दीप प्रज्वलन करुन झाली.त्यानंतर सर्व उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सर्वांनी 'क्रीडा प्रतिज्ञा ' केली.
सविस्तर मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद पतंगे सर, क्रीडा विभाग प्रमुख डॉ म्हेत्रे सर आणि डॉ शिल्पा रेवले मॅडम यांनी केले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद पतंगे सर उपस्थित होते तसेच क्रीडा विभाग प्रमुख डॉ सुनील म्हेत्रे सर , सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ संगीता शिंदे मॅडम , डॉ शिल्पा रेवले मॅडम , डॉ जगदाळे मॅडम, डॉ चेतन पाटील सर, नलावडे मॅडम आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.